nasyaकेस गळणे, अकाली पांढरे होणे, डोके दुखी, स्ट्रेस व त्यामुळे होणारी अपूर्ण किंवा अव्यवस्थित झोप, मान दुखणे, वारंवार होणारी सर्दी, हे आजकाल सरसकट सहज आढळणार्‍या आणि लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात स्वीकारलेल्या तक्रारी आपल्याला बघायला मिळतात. ह्या सर्व तक्रारी त्यांना आवडतात म्हणून नाहि, तर ह्या तक्रारींमुळे त्यांच्या रोजच्या रूटिन मधे काहि बाधा येत नाहि ना, म्हणून. पण खरंच ह्या सर्व तक्रारी इतक्या सहज दुर्लक्ष करण्यासारख्या आहेत का? वारंवार हेडफोन्स वापरुन, सतत कॉम्प्युटर/मोबाईल स्क्रिन कडे बघुन डोकेदुखी, डोळ्यांवर ताण येणं, त्यामुळे होणारी चिडचिड. सततच्या अपूर्ण झोपेमुळे अनुत्साह, अस्वस्थ वाटणे, व त्यातुनच पुढे अपचन, अजीर्ण, इत्यादि पोटाचे विकार, ब्लड प्रेशर इ. सारखे विकार संभवतात.

आपल्या दिनचर्येत केलेल्या एका छोट्याशा बदलाने, ह्या सर्व तक्रारी दूर होऊन आपले आरोग्य टिकवण्यास मदत होऊ शकते.

नस्य – २ थेंब आरोग्याचे.

नस्य म्हणजे पंचकर्मातील पाच कर्मांपैकी एक कर्म.  नाकाद्वारे जे औषध शरीरात प्रविष्ट केले जाते त्यास  नस्य म्हणतात. नस्याचे कार्यक्षेत्र हे सर्व उर्ध्वजत्रुगत व्याधींवर दिसून येते.

|| नासाहि शिरसो द्वारम् ||

– म्हणजे नाका वाटे जे औषध दिले जाते  ते  थेट शिर(डोक्यापर्यंत) पोहचते. म्हणूनच उर्ध्वजत्रुगत (कान,नाक,घसा,मान,डोकं,खांदे,इ) विकारांमधे नस्य हि एक प्रभावी चिकित्सा ठरते. नस्याचे मुख्य कार्य हे उर्ध्वजत्रुगत अवयवातील दोषांचे निर्हरण करणे असले तरीहि, नस्याचा एक प्रकार  असा आहे जो आपण आपल्या दररोजच्या व्यवहारात उपयोग करु शकतो – प्रतिमर्श नस्य. प्रतिमर्श नस्यामधे नस्य औषधींचे प्रमाण हे अगदी अल्प असते, ज्यामुळे दोषांचे शमन होते आणि  उर्ध्वजत्रुगत अवयवांचे बल वाढण्यास मदत होते.

नस्य कर्मविधी : आडवे झोपून मान खाली झुकलेली असावी, एक एक करुन दोन्ही नाकपुड्यांमधे २-२ थेंब  नस्य द्रव्य (औषधी तेल/तूप) टाकावे. हळूवारपणे दिर्घ श्वास घ्यावा. १-२ मिनिटे तसेच पडून राहावे, औषध घशात आल्यास थुंकावे व कोमट पाण्याने गुळण्या कराव्या.

नस्य कधी करु नये : सर्दी, ताप, काान-नाक-घसा ह्यांचे विकार (इन्फेक्शन),इ. असताना नस्य कर्म टाळावे.

आयुर्वेदानुसाुरप्रतिमर्श नस्याचे १५ काळ वर्णन केले आहेत, परंतु आपला दिनक्रम आणि धावपळ लक्षात घेता, दिवसातून किमान १-२ वेळा नस्य केल्यास देखिल आपण नस्याचे फायदे अनुभवू शकतो. यष्टीमधु तैल, गाईचे शुद्ध तूप, अथवा तुमच्या प्रकृति व विकृतिनुसार  तुमच्या वैद्यांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही नस्य औषधी निवडू शकता.

नस्याच्या नियमित वापरामुळे मिळणारे फायदे :

नस्याचे हे २ थेंब आरोग्याचे आपल्यासाठी सहज करण्याजोगे, सोपे, स्वस्त व बहूगुणकारी असे आयुर्वेदाच्या खजिन्यातले वरदान अाहे. आपण सर्वांनी ह्याचा उपयोग करावा व आपले आरोग्य वाढवावे.

 

टिप: नस्य सुरु करण्यपूर्वी आपल्या वैद्यांचा सल्ला जरुर घ्यावा, जेणेकरुन तुम्ही नस्य करण्यास योग्य आहात का? व तुम्हला तुमच्या प्रकृतिनुसार नस्य द्रव्याचे चयन करण्यास योग्य मार्गदर्शन मिळू शकेल.