परवा आम्ही जुन्या मैत्रीणी लंचसाठी भेटलो होतो, जेवण झाल्यावर छान गप्पा मारु म्हटलं तर एक जण म्हणाली, “अग नाही मी नीघते, माझी ४ वाजता पारलर मधे अपाँइंटमेंट आहे.” मी म्हणाले, “अगं एवढं काय? जा कधीतरी नंतर, आज राहू दे ना.” त्यावार मलाच म्हणाली, “तुला काय माहिती, तुझं बरं आहे बाबा, तुझा चेहरा छान क्लिन अहे, आमच तसं नाही ना”. खरच खूप डाग होते तीच्या चेहर्यावर, त्वचा पण रुक्ष आणि निर्जीव दिसत होती. असं का झालं विचारल्यावर नाराजिनेच म्हणाली,”काही माहित नाही गं, तरी मी रेग्युलरली क्लिन अप आणि फेशियल करुन घेत असते”. मी म्हणाले,”अगं वेडे...