पावसाळा सुरु झाला म्हणजे मन कसं प्रसन्न होते, मातीचा सुगंध, हवेतील गारवा, गरम गरम चहा आणि भजी (तळलेले पदार्थ)… वा… कसा छान बेत जमतो. अहो पण कधी विचार केलात, भजीच का? श्रिखंड, बासूंदी, ताक, अगदी आईस्क्रिम का नाहि, खावेसे वाटत आपल्याला? सांगते, आपल्या शास्त्रात म्हणजे (आयुर्वेदात) ह्या सगळ्याची शास्त्रशुद्ध उत्तरे आहेत. आयुर्वेद हे फक्त व्याधी उपचाराचे नाही तर जीवन जगण्याचे शास्त्र आहे. सद्वृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या, स्वास्थ्य, आरोग्य आणि दिर्घायुष्य कमावण्याचे साधन आहे. प्रत्येक ऋतुच्या गुणधर्मानुसार, आपला आहार विहार बदलत असतो, व परीणामतः शारीरिक दोषांमधे देखिल बदल होतच असतात. एकूण ६ ऋतु, त्यांचे गुणधर्म,त्याचा शरीर दोषांवर होणारा परीणाम आणि त्या अनुषंगाने पाळावयाची ऋतुचर्या, पुन्हा कधीतरी सविस्तर बघु. वर्षा ऋतु, आणि त्याच्या अगोदर असणारा ऋुतु म्हणजे,...