आपल्या घरात, नातेवाईक,शेजारी, मित्र परीवार ह्यापैकी कितीतरीजणं सकाळी उठून गरम पाणी आणि मध वर्षानुवर्ष घेतात – कारण विचारल्यास – वजन कमी होतं म्हणे. आता हे कोणी आणि कुठे म्हटलं आहे, हे कोणालाच माहिती नाहि. ह्या लेखात आपण मधाचे ग्रंथाोक्त गुणधर्म आणि मध सेवन करण्याचे नियम बघुया. “चक्षुष्यं छेदि तृट्श्लेष्माविषहिध्मास्रपित्तनुत् | मेहकुष्ठकृमिच्छर्दिश्वासकासातिसारनुत् || व्रणशोधनसंधानरोपणं...