काहि दिवसांपूर्वी दवाखान्यात एक कॉलेजकुमारी आली, बराच वेळ बसावं लागल्यामुळे क्लिनिक मधील गोष्टी निहाळत बसली होती. भेटल्यावर तिचा पहिला प्रश्न असा होता, “अय्या डॉक्टर तुम्ही हे दंतमंजन का ठेवलं आहे?, किती ओल्ड फँश्नड आहे ते, हल्ली कोणीतरी वापरतं का हे ?” मी तीला म्हटलं, ” अगं का नाही?, पूर्वी आपले आजी, आजोबा निम्ब, बकुळ, बाभूळ, खैर इ. ह्याच्या काड्या किंवा चूर्ण नाही वापरायचे का? एवढंच कशाला, काहिच नसलं तर चूलितील राख किंवा मीठाने देखील दात घासायचे. त्यांना कधी, दात दुखणे, किडणे, सेन्सिटिवीटिचे प्रॉब्लेम होते का गं?” दंतमंजन किंवा दन्तधावन हे शब्द आजकाल आपल्या शब्दकोषातून जणू गायबच झाले आहेत, आणि त्यांची जागा घेतली आहे अकर्षक जाहिरातीद्वारे प्रचलित – रंगीत, जेल युक्त, चमकणारया फ्लेवर्ड...