“वर्षा ऋतु आणि आरोग्य“,ह्या लेखात आपण त्या काळातील दोषांची अवस्था आणि त्यावर केले जाणारे उपचार, हे सविस्तर पाहिले. वर्षा ऋतुमधे वात दोषाचा प्रकोप होतो. ह्याच दरम्यान गढूळ पाणी, व मंदावलेली पचनशक्ति,- ह्याचा परिणाम स्वरुप – अन्नाचा अम्ल विपाक होउन शरीरात पित्त साठू लागतं. शरद ऋतु सुरु होताच (October heat) वाढत्या प्रखर उन्हाच्या तडाख्याने, ह्या साठलेल्या पित्ताला बळ मिळतं, आणि त्या पित्ताचं प्रमाण वाढतं; म्हणजेच ह्या पित्तचा प्रकोप होऊन लोकांमधे पित्ताचे आजार आपलं डोकं वर काढु लागतात. उलट्या, मळमळ, जळजळ, अंगावर गांधी उटणे, ताप, हाथ-पाय, डोळ्यांची आग होणे, जुलाब अशी लक्षणे दिसू लागतात. पित्त आणि रक्ताचा अतिव जवळचा संबंध असल्याने, हे प्रकुपित पित्त रक्ताला देखील बिघडवतं आणि तारुण्य पिटीका...